समाजमाध्यमे लोकशाहीसाठी धोकादायक ठरतील का?
दुसरी बाजू कशी नालायक आहे, खोटारडी, वाईट, कुचाळखोर आहे, हेच प्रत्येक बाजू पुन्हापुन्हा ऐकत असल्यामुळे सहानुभूतीला काही वावच राहात नाही. क्षुद्रता, अफवा आणि अवाजवी गहजब यांच्यातच लोक गुंतून राहिल्यामुळे, आपण राहतो त्या समाजाच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. तसे झाल्याने उदारमतवादी लोकशाहीतील तडजोडी आणि बारकाव्यांना छेद जातो आणि कटकारस्थाने, स्थानिक राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना.......